“महावितरणने लॉक डाऊनच्या काळात शहरातील वीज ग्राहकांना सहकार्य करावे ” – आमदार अण्णा बनसोडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – ता. ३० – कोरोना मुळे गेली तीन महिने वीज ग्राहकांचे मीटर रीडिंग नोंदवून घेणे महावितरण बंद ठेवले होते. कोरोनाचा प्राधुर्भाव थोपविण्यासाठी सुमारे तीन महिने ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेतले गेले नव्हते. लॉक डाऊन शिथिल होताच महावितरण कंपनीने वीज ग्राकांचे मीटर रीडिंग घेणे सुरु केले असून तीन महिन्यांचे एकत्रितपणे वीज बिल ग्राहकांना येणार आहे. सरासरी वीज वापरा पेक्षा एकत्रित रीडिंग घेतल्याने वीज दराबाबत लागू असलेल्या स्लॅब नुसार बिलाची आकारणी होणार आहे. १०० युनिट पर्यंत ३.७६ रु. १०१ ते ३०० पर्यंत ७.४३ रुपये व ३०१ ते ५०० युनिट साठी १०.३२ रु. तर ५०१ युनिटच्या पुढे ११.७१ रुपये प्रती युनिट असे दर असून १ एप्रिल पासून मनपा क्षेत्रासाठी १० अतिरिक्त स्थिर आकार लागू करण्यात आलेला आहे. याच युनिट वापरावर वहन आकार व वीज शुल्क आकारणी अवलंबून आहे. त्या अनुषंगाने एखाद्या ग्राहकाचा दर महा वीज वापर १०० युनिट असेल तर त्या ग्राहकाचा वापर एकत्रित बिलामुळे ३०० युनिट दिसणार आहे. त्याच्या वीज बिलात एकत्रित ३ महिन्याचे रीडिंग घेतल्याने युनिट दर आकारणीत फरक येणार आहे. अशा परिस्थितीत त्या ग्राहकाला नाहक भुर्दंड बसणार आहे. हा भुर्दंड सामान्य घरगुती वीज ग्राहकास बसू नये म्हणून आमदार अण्णा बनसोडे यांनी महावितरणच्या गणेश खिंड परिमंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. पंकज तगडपल्लेवार व पिंपरी डिव्हिजनचे कार्यकारी अभियंता श्री. वायफळकर यांच्यासमवेत बैठक घेऊन सूचना दिल्या.

सामन्य मीटर रीडिंग मधील दोष तात्काळ निवारण करून योग्य वीज देयेके ग्राहकांना दुरुस्त करून द्यावीत व ही बिले भरण्यासाठी हप्ते बांधून द्यावेत तसेच कोरोनाच्या महामारीच्या काळात घरघुती वीज ग्राहकांना सहकार्य करा अशाही सूचना केली. शहरात वीज पुरवठा सुरळीतपणे राहावा याबाबत आवश्यक काळजी घ्यावी. पावसाळा सुरु होत असल्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढणार असल्याने याबाबत कोणते नियोजन करण्यात आले आहे, याचाही आढावा बनसोडे यांनी घेतला.

वीज बिलामध्ये दोष असल्यास ग्राहकाने आमच्या जवळच्या कार्यालयातून वीज देयक दुरुस्त करून घ्यावे तसेच पावसाळ्यातील आवश्यक कामे महावितरणने केलेली असून ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीतपणे ठेवण्यासाठी कोरोनाच्या काळातही आम्ही कार्यरत असून नागरिकांनी काळजी घेऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन अधिक्षक अभियंता तगडपल्लेवार व का. अभि. वायफळकर यांनी केले. तसेच शहरातील वीज पुरवठयासाठी आवश्यक साधनसामुग्री व भूमीत वीज वाहिन्या टाकण्यासाठी लागणार निधी याचा एकत्रित DPR करण्याच्या सूचना बनसोडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून शहरातील कामासाठी लागणारा निधी राज्य शासनाकडून आणण्यासाठी कमी पडणार नसल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *