T20 World Cup 2024 : या संघाला मोठा धक्का ! टी-20 वर्ल्ड कपमधून मॅच विनर खेळाडू बाहेर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुन ।। Kyle Mayers replaces injured Brandon King in West Indies squad : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये संयुक्त यजमान वेस्ट इंडिज संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू ब्रँडन किंग आता स्नायूंच्या ताणाच्या समस्येमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने किंगच्या जागी बदली खेळाडू आणण्याची विंडीज क्रिकेट बोर्डाची विनंती मान्य केली आहे. चालू स्पर्धेत किंग बाहेर जाणे हा वेस्ट इंडिज संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ब्रँडन किंगच्या जागी विंडीज क्रिकेटने 31 वर्षीय अष्टपैलू काइल मेयर्सला आपल्या संघाचा भाग बनवले आहे. मेयर्सने आतापर्यंत 37 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मेयर्स त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात असला तरी गरज पडेल तेव्हा तो गोलंदाजीचा पर्याय म्हणूनही उपलब्ध आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सुपर 8 सामन्यादरम्यान, ब्रँडन किंगला फलंदाजी करताना स्नायूंना दुखापत झाली होती, त्यानंतर तो निवृत्त झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर त्याला स्कॅनिंगसाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने काइल मेयर्सला बदली खेळाडू म्हणून आपल्या संघाचा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडविरुद्धचा सामना गमावलेल्या वेस्ट इंडिज संघाला सुपर 8 मधील आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील, ज्यामध्ये तो अमेरिकेविरुद्ध एक सामना खेळत आहे आणि पुढील सामना. भारतीय वेळेनुसार 24 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *