पावसाळ्यात भेट द्या ; महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण इथं गुरुत्वाकर्षणाचा नियम ठरतो फेल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुन ।। महाराष्ट्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि चमत्कारिक ठिकाणे आहेत. यापैकीच एक महाराष्ट्रातील उलटा धबधबा. येथे गुरुत्वाकर्षणाचा नियम फेल ठरतो आणि पाणी जमीनीच्या दिशेने न वाहता आकाशाच्या दिशेने वाहते.


हवेच्या दाबामुळे धबधबा उलटा फिरू लागतो. यामुळेच डोंगर कपारीवर उभ राहून पर्यटक या धबधब्यात भिजण्याच आनंद लुटतात.हा धबधब्यातील पाणी उंचीवरून खाली कोसळणारे पाणी खावी दरीत पडण्याऐवजी आकाशाच्या दिशेने प्रवाहित होते. कोकणकडा नाणेघाट धबधबा परिसर हा नेहमी धुक्यात हरवलेला असतो. यामुळे पर्यटक येथील निसर्गसौदंर्याच्या प्रेमात पडतात.वाऱ्याच्या प्रवाहाने उंचावरून पडणारे पाणी हे थेट आकाशाच्या दिशेने वरती फेकले जाते. नाणेघाट धबधबा हा एक वैशिष्ट्यपूर्ण असे पर्यटन स्थळ आहे.नाणेघाट हे पुण्यातील जुन्नरजवळ महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आहे. हे मुंबईपासून तीन तासांच्या अंतरावर आहे. जुन्नर तालुक्यातील दुर्गवाडी कोकणकडा परिसरात असलेला हा धबधबा रिव्हर्स Waterfall म्हणून प्रसिद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *