महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुन ।। टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या सुपर-8 फेरीतील आता केवळ दोन सामने बाकी आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश असे अ ग्रुपमधील हे दोन्ही सामने बाकी आहेत. हे दोन्ही सामने चारही संघांसाठी उपांत्य फेरीत पोहचण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
दरम्यान, भारतीय संघाचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात काट्याची टक्कर आहे. तसेच बांगलादेशसाठी मात्र ही शर्यत सर्वात कठीण आहे.
बांगलादेशने सुपर-8 मधील पहिले दोन्ही सामने पराभूत झाले आहेत. पण असे असले तरी त्यांचे आव्हान अद्याप संपलेले नाही. त्यांनाही उपांत्य फेरीत जाण्याची संधी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी नक्की काय समीकरण आहे, जाणून घेऊ.
आधी गुणतालिकेची स्थिती जाणून घेऊ. तर अ ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने 2 सामन्यांतील विजयांसह 4 गुण मिळवले असून त्यांचा 2.245 नेट रन रेट आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांनी 1 विजय आणि 1 पराभव स्विकारल्याने त्यांचे 2 गुण आहेत आणि 0.223 नेट रन रेट आहे.
Afghanistan's unforgettable win over Australia keeps the race for semi-final spots from Group 1 wide open ????
???? https://t.co/5r9YRQxCRY pic.twitter.com/Uunw28ab1R
— ICC (@ICC) June 23, 2024
अफगाणिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनीही 1 विजय आणि 1 पराभवासह 2 गुण मिळवले असून – 0.650 नेट रन रेट आहे. बांगलादेश या गुणतालिकेत सर्वात खाली असून त्यांनी दोन्ही सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्यांचे शून्य गुण असून त्यांचा -2.489 नेट रन रेट आहे.
असे आहे बांगलादेशसाठी समीकरण
जर भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले, तरच बांगलादेशच्या उपांत्य फेरीत पोहण्याच्या आशा जिवंत राहणार आहेत. तसेच बांगलादेशला अफगाणिस्तानालाही पराभूत करावे लागणार आहे. कारण तसे झाल्यास ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही संघांचे 2 गुण होतील, त्यामुळे नेट रन रेटनुसार दुसऱ्या क्रमांकाचा संघ ठरेल.
आता नेट रन रेटचा विचार केला, तर बांगलादेशला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी आशा करावी लागेल की ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्ध कमीत कमी 55 धावांनी पराभूत झाला पाहिजे.
त्याचबरोबर बांगलादेशने अफगाणिस्तानला 31 धावांनी पराभूत केले पाहिजे, तरच बांगलादेश ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला नेट रन रेटमध्ये मागे टाकत उपांत्य फेरी गाठतील.
एकूण आता अ ग्रुपमध्ये होणारे दोन्ही सामन्यात सर्वच संघ जीवाची बाजी लावताना दिसणार आहेत.