महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ता. २ : कोरोनामुळे आयटीतील बहुसंख्य कर्मचाऱ्यांचे अजूनही वर्क फ्रॉम होमच सुरू आहे. यामुळे कामावर आणि उत्पादकतेवर फारसा परिणाम होत नसल्याचे निरीक्षणही कंपन्यांनी नोंदविले. पुढील किमान तीन ते सहा महिने असेच काम होणार असल्याने काही कंपन्यांनी त्यांच्या भाडेतत्त्वावरील जागा परत करून खर्च कमी केला आहे.
शहर आणि परिसरातील आयटी कंपन्यांतील सुमारे ७० टक्के कर्मचारी सध्या घरातून काम करीत आहेत. तसेच केंद्र व राज्य सरकारनेही आयटी कंपन्यांना ३३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची परवानगी दिली आहे. परिणामी अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुढील तीन ते सहा महिने वर्क फ्रॉम होम करण्याची तयारी ठेवण्यास सांगितले आहे.
वर्क फ्रॉम होममध्ये
कंपन्यांकडून इंटरनेट पुरविले जाते
कामाची पद्धत, वेळ, प्रोजेक्ट यावर देखरेख
साप्ताहिक सुटी व रजाही देण्यात येते
किमान ८ ते १० तास काम
ग्रुप, कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉलचे प्रमाण वाढले
तंत्रज्ञानाची चाचपणी
सध्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे ऑनसाइट जाणे बंद झाले आहे. त्यामुळे संबंधित साइटवर काम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांची मदतही घेतली जात असल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात आले.
येथे आहेत प्रमुख आयटी कंपन्या
हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, नगर रस्ता, बाणेर