महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुन ।। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)ने भरती जाहीर केली आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.NHAI ने वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. १८ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
NHAI भरतीसाठी निवडलेल्या उमेदवारांचा कालावधी २ वर्षांसाठी आहे. हा कालावधी उमेदवारांच्या कामगिरीनुसार वाढवण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. NHAI भरतीमध्ये उमेदवारांची निवड समितीद्वारे केली जाईल. या भरतीमध्ये DPR तज्ञ, वरिष्ठ महामार्ग तज्ञ, रस्ता सुरक्षा तज्ञ, पर्यावरण/वन तज्ञ, भूतंत्र तज्ञ, या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
NHAI भरतीमध्ये अर्ज
करणाऱ्या व्यक्तीचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वयोगटासाठी वयाची अट वेगळी आहे. त्यांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
प्रिन्सिपल डीपीआर तज्ञ या पदासाठी उमेदवारांना ६ लाख रुपयांचे मासिक वेतन दिले जाईल. तर वरिष्ठ महामार्ग तज्ञ या पदासाठी ५.५० लाखांपर्यंत वेतन दिले जाईल. रस्ता सुरक्षा तज्ञ, वाहतूक तज्ञ यांना ४.५० लाख रुपये मासिक पगार मिळणार आहे. तर इतर पदांसाठी २.३० लाख रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे.या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग NHAI मुख्यालय, नवी दिलेली येथे करण्यात येणार आहे.