महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुन ।। Ashadhi Wari 2024: आषाढी वारीला सुरूवात झाली असून अनेक ठिकाणांहून पालख्या पंढरपुरच्या दिशेने निघाल्या आहेत. आज संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपुरकडे रवाना होणार आहे. यानिमित्त्याने वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी असणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी शहरात पाच हजार पोलिसांचा बदोबस्त तैनात करण्यात आला असून यंदा सीसीटीव्ही कॅमेराची करडी नजर सोहळ्यावर असणार आहे.