महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुन ।। देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. एकीकडे भाज्या, फळे महागली आहेत, तर दुसरीकडे आता गरजेची झालेली मोबाइल सेवाही महाग होत आहे. जिओ ने आपल्या 5जी इंटरनेट आणि रिचार्जच्या दरात जवळपास 20 ते 25 टक्क्यांनी दरवाढ केली आहे. त्या पाठोपाठ आज Airtel ने देखील दरवाढ जाहीर केली आहे.
Airtel ने सुधारित मोबाइल दरांची घोषणा केली. या किमती Bharti Hexacom Ltd. मंडळांसह सर्व मंडळांना लागू आहेत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. Airtel च्या सर्व योजनांसाठी नवीन दर http://www.airtel.in वर उपलब्ध असतील. 3 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. Airtel च्या पोस्टपेड प्लानमध्ये जवळपास 40 ते 50 रुपयांची दरवाढ झाली आहे. तर प्रिपेड प्लान्स मध्ये कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 200 रुपयांची वाढ झाली आहे.
सुरुवातीला मोफत सीमकार्ड देऊन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करणाऱ्या जिओ कंपनीने मात्र आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. जिओने आपल्या 5जी इंटरनेट आणि रिचार्जच्या दरात जवळपास 20 ते 25 टक्क्यांनी दरवाढ केली आहे.
जिओने आपल्या ग्राहकांना धक्का दिसा असून जुलै महिन्यापासून जिओचे रिचार्च महाग होणार आहेत. जिओचा नवीन प्लॅन 3 जूलै 2024 पासून लागु होणार आहेत. यानुसार Preepaid आणि Postpaid प्लॅनच्या किंमती 50 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. म्हणजेच 399 रुपयांना मिळणारा रिचार्ज जुलै महिन्यापासून 449 रुपयांना मिळणार आहे.