TATA Most Valued Brand: टाटा नाम ही काफी है ;बनला भारताचा सर्वात मौल्यवान ब्रँड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुन ।। उद्योगपती मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज आजच्या काळात देशातील सर्वात मोठी कंपनी आहे, आणि त्याचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. तसेच दुसरीकडे, गौतम अदानी देशाच्या प्रत्येक क्षेत्रात पाय पसरवत असतील, परंतु असेही एक स्थान आहे जिथे दोघे समूह टाटांच्या पुढे टिकत नाही. इथे केवळ टाटा समूहाचाच बोलबाला दिसतो आणि ते म्हणजे ब्रँड व्हॅल्युएशन. होय, टाटा समूहाने पुन्हा एकदा भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे.


दुसरीकडे, इन्फोसिस आणि एचडीएफसी ग्रुप देशातील अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे आघाडीचे ब्रँड बनले आहेत. असा कोणता अहवाल आला आहे, ज्यामध्ये टाटा समूहाची ताकद स्पष्टपणे दिसून येते जाणून घेऊया.

टाटा ब्रँडचा जलवा कायम
ब्रँड फायनान्सने जारी केलेल्या ताज्या क्रमवारीत टाटा समूह पुन्हा भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड ठरला आहे. टाटा समूहाचा ब्रँड व्हॅल्यू २८.६ अब्ज डॉलर्स आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ९% जास्त असून डिजिटलायझेशन, ई-कॉमर्स, इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्सवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नवीन व्यवसाय धोरणामुळे टाटा समूहाला क्रमवारीत फायदा झाल्याचे दिसून येते. ब्रँड फायनान्सच्या अहवालानुसार टाटा समूहाचे ब्रँड व्हॅल्यू पहिल्यांदाच ३० अब्ज डॉलर्सच्या जवळ येत आहे जे भारतीय अर्थव्यवस्थेवरील वाढत्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे.

अहवालानुसार ३० अब्ज डॉलर्स ब्रँड व्हॅल्युएशनच्या जवळ पोहोचणारा टाटा समूह पहिलाच भारतीय ब्रँड ठरला तर देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी इन्फोसिस दुसऱ्या क्रमांकावर असून आयटी कंपनीनेही ९% वाढ नोंदवली आहे. जागतिक IT सेवा क्षेत्रातील मंदी असूनही या कंपनीचे ब्रँड मूल्य १४.२ अब्ज डॉलर्स आहे. त्याचवेळी एचडीएफसी (HDFC) समूह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, HDFC समूहाचे मूल्यांकन १०.४ अब्ज डॉलर्स आहे त्यामुळे हा देशातील तिसरा सर्वात मोठा ब्रँड बनला असून गेल्या वर्षी गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी लिमिटेडमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर एचडीएफसीला खूप फायदा झाला आहे. अहवालानुसार टेलिकॉम सेक्टरच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये सर्वाधिक कमाल ६१ टक्के वाढ दिसून आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *