महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुन ।। IND vs SA T20 World Cup 2024 Final : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2024 चा चॅम्पियन होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत आणि वर्ल्ड कप ट्रॉफीच्या मध्ये उभा आहे आणि त्यांना पराभूत करूनच टीम इंडिया दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकायचा आहे.
अंतिम सामना बार्बाडोसमध्ये खेळवला जाणार आहे आणि या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे, तर राखीव दिवशी म्हणजे रविवारीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
बार्बाडोसमधील खेळपट्टीचे स्वरूप कसे असेल?
बार्बाडोसमध्ये 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी आतापर्यंत 8 सामने खेळले गेले आहेत. येथील खेळपट्टीचे वैशिष्टय़ म्हणजे फलंदाजांसोबतच गोलंदाजांनाही पूर्ण साथ मिळते. या मैदानावर तुम्हाला मोठी धावसंख्या पाहायला मिळते आणि येथेच भारताने सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. बार्बाडोसमध्ये धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे नाही. अशा परिस्थितीत अंतिम सामन्यात प्रथम खेळणाऱ्या संघाने 175 धावसंख्या फलकावर ठेवली तर ती विजयी धावसंख्या असेल.
बार्बाडोसमध्ये पहिल्यांदा काय करणे ठरणार फायदेशीर?
बार्बाडोसबद्दल बोलायचे तर येथे आतापर्यंत एकूण 32 सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 19 सामने जिंकले आहेत तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी 10 सामने जिंकले आहेत. येथील पहिल्या डावाची सरासरी 153 धावांची आहे. अशा स्थितीत अंतिम फेरीत जो संघ नाणेफेक जिंकेल, प्रथम फलंदाजी करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.
या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध केली होती जी 5 विकेट्सवर 224 धावा होती. तर सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे जो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 80 धावांवर ऑल आऊट झाला होता.