Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणाला मिळू शकतो ‘आयुष्मान कार्ड’चा लाभ? जाणून घ्या नियम-अटी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुन ।। देशात अनेक प्रकारच्या योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येतात. प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देणे हा या योजना चालवण्याचा उद्देश आहे. त्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर या योजना सुरू करते. अशीच एक योजना आहे ज्याचं नाव आहे आयुष्मान ‘भारत योजना’.

यामध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ दिला जातो. अशातच जर तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करून लाभ घ्यायचा असेल, तर सर्वातआधी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता…

आयुष्मान कार्ड योजना काय आहे?
आयुष्मान भारत योजना ही गरीब नागरिकांना लाभ देणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील सामान्य नागरिकांना विशेषतः गरीब लोकांना मोफत वैद्यकीय सुविधा दिली जाते. जर तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असेल, तर तुम्हाला कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार मिळतो.

जाणून घ्या पात्रता
जर तुम्हाला आयुष्मान योजनेचा लाभ घ्यायचाअसेल तर आधी तुम्ही पात्र आहात की नाही, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्हाला तुमची पात्रता तपासावी लागेल आणि तुम्ही पात्र असाल तरच तुम्ही अर्ज करू शकता. पात्रता तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी pmjay.gov.in या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावं लागेल.

योजना पोर्टलवर गेल्यावर तुम्हाला येथे अनेक पर्याय दिसतील. पण तुम्हाला वर दिलेल्या ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर इथे टाकावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्ड येईल. तुम्हाला येथे मिळालेला OTP भरावा लागेल. आता तुम्हाला दोन पर्याय दिसतील. तुम्हाला फक्त पहिल्या पर्यायात तुमचे राज्य (तुम्ही राहता ते राज्य) निवडावे लागेल.

पहिल्या पर्यायानंतर, दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाइल क्रमांक आणि रेशनकार्ड क्रमांक टाकावा लागेल. मग तुम्हाला एक सर्च बटण दिसेल, त्यावर क्लिक करा. तुम्ही हे करताच, तुमच्या समोर स्क्रीनवर माहिती मिळेल की, तुम्ही आयुष्मान कार्ड बनवण्यास पात्र आहात की नाही.

आयुष्मान कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि यासाठी तुमचे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, रेशन कार्ड इत्यादीसारखी काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अर्जाच्या वेळी विभागाने तुमच्याकडून इतर कोणतेही दस्तऐवज मागितल्यास, तुम्हाला ते देखील द्यावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *