जुलै महिन्यात ‘या’ बाबींचा खिशावर होईल परिणाम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।। दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून बँकिंग तसेच अर्थविषयक बाबींच्या नियमांमध्ये बदल होतात. याचा परिणाम तुमच्या खिशावर तसेच महिन्याच्या नियोजनावर होत असतो. त्यामुळे १ जुलै २०२४ पासून होत असलेले बदल लक्षात घेणे गरजेचे आहे. हे लक्षात न घेतल्यास तुमची तारांबळ उडू शकते.

आयटीआरची अंतिम मुदत
आयकर विभागाने २०२४-२५ या मूल्यांकन वर्षाचे आयटीआर भरण्यासाठी ३१ जुलै २०२४ ही मुदत निश्चित केली आहे. ही मुदत चुकवल्यास तुम्हाला दंड आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

कार्ड पेमेंटमध्ये बदल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ जुलैपासून सर्व क्रेडिट कार्ड पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम (बीबीपीएस)द्वारे केले जावेत, असे निर्देश दिले. फोनपे, क्रेड, बिलडेस्क आदी फिनटेक प्लॅटफॉर्मवर होईल.

अर्थसंकल्प सादर होणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन तिसऱ्या आठवड्यात मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करू शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २२ जुलैला बजेट सादर होण्याची शक्यता आहे.

रिचार्ज महागणार
देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या – रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने त्यांचे रिचार्ज महाग केले आहे. दोन वर्षांत प्रथमच कंपन्यांनी टॅरिफ प्लानच्या किमती वाढवल्या.

सीएनजी व पीएनजीचे दर
एलपीजी सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीचा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आढावा घेतला जात असतो. १ जून रोजी सरकारने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *