राज्यातील ‘या’ भागात मुसळधारेचा इशारा ; पावसाचा जोर वाढणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।। राज्यात आज सोमवार (दि.1 जुलै) पासून मान्सून सक्रिय होत असून सलग तीन आठवडे (दि.21 जुलै) पर्यंत सर्वच भागात संततधार पाऊस राहणार आहे. तसेच, पुणे ते पंढरपूर या पालखी मार्गावर सलग तीन आठवडे हलका, मध्यम ते संततधार असा पाऊस सुरू राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. Maharashtra Rain Update

जून महिन्यात मान्सूनने संपूर्ण देशात पोहोचण्यास वेळ घेतला. हवेचे दाब अन् वाऱ्याचा वेग कमी याचे गुणोत्तर असमान असल्याने बहुतांश भागात हलकाच पाऊस जूनमध्ये झाला. कोकण घाटमाथा वगळता 80 ते 100 मिलीमीटरच्या वर कुठेही पाऊस झाला नाही. मात्र, जुलैमध्ये मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे देशभरात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. राज्यात 1 ते 21 जुलै या तीन आठवड्यात संततधार ते मुसळधार अशा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

असे आहेत या आठवड्याचे अलर्ट
कोकण : 1 ते 6 जुलै (मुसळधार)

मध्यमहाराष्ट्र : 1, 5, 6 जुलै (मध्यम) 2 ते 4 जुलै (हलका)

मराठवाडा : 1 ते 6 जुलै (हलका)

विदर्भ : 1 ते 3 जुलै (मध्यम) 4 ते 6 जुलै (मुसळधार)

पालखी मार्गावर संततधारेचा अंदाज
हवामान विभागाने पालखी मार्गावरील पावसाचा अंदाजासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. आयएमडी पुणे या संकेतस्थळावर पालखी नावाचे स्वतंत्र पोर्टला तयार केले असून पालखी मार्गावरील पावसाचे अंदाज आगामी वीस ते एकवीस दिवस दिले जाणार आहेत. यात प्रामुख्याने घाटमाथ्यावर संततधार पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. Maharashtra Rain Update

24 तासांतील पाऊस
कोकण : कणकवली 88, दापोली 77, लांजा 64, वाकवली 63, हरनाई 61, आवळेगाव 52, जव्हार 51, सावंतवाडी 50, फोंडा 48, दोडामार्ग 47, सांगे 44, गुहाघर 44, रत्नागिरी 41, मुल्दे 41, कुडाळ 41, वैभववाडी 40, केपे 40, मुरबाड 40, रोहा 30, राजापूर 39, संगमेश्वर देवरूख 38, कानाकोना 38, वाडा 36, मंडणगड 35, माथेरान 35, विक्रमगड 33, माणगाव 33, सुधागड पाली 31, तळा 31, खेड 27, पेण 26,

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर 79, गगनबावडा 49, शाहूवाडी 49, लोणावळा 47, वेल्हे 46, रावेर 43, शिरपूर 42, ओझरखेडा 28, मराठवाडा : बिलोली 30, किनवट 25, जळकोट 20, मुखेड 20, देगलूर 16, सिल्लोड 12, गंगाखेड 10,

विदर्भ : यवतमाळ 56, नेर 33, दिग्रस 33, बाभूळगाव 33, दारव्हा 27, राजुरा 24, नागपूर 18, घाटमाथा : लोणावळा 163, कोयना 100, अंबोणे 68, ताम्हिणी 56, दावडी 47, डुंगरवाडी 42, कोयना (पोफळी) 39, शिरगाव 37, धारावी 37.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *