महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 2 जुलै ।। ताम्हिणी घाट येथे एक जण धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर त्याचे शोधकार्य सुरु झाले. स्वप्नील धावडे असे त्याने नाव होते. तो ताम्हिणी घाटात मुलांना ट्रेकिंगसाठी घेऊन गेला होता. पण, तेथील वाहत्या धबधब्यात त्याने सूर लावला अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. धबधब्याचा प्रवाह इतका मोठा होता की, तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याची मुलगी तेथेच होती. दुर्दैवाने तिच्या कॅमेरामध्ये हे क्षण टिपले गेले. आणि स्वत: चा बाप वाहून जाताना धक्कादायक घटना कॅमेराबद्ध झाली.
स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगचे राष्ट्रीय खेळाडू होते. त्यांनी भारतीय सैन्य दलातही सेवा दिली होती. दुर्देवाने ते ताम्हिणी घाटातील धबधब्यात गेले अन् वाहून गेले.
नेमकं काय घडलं?
स्वप्नीलने धबधब्याच्या प्रवाहात सूर मारला. त्यावेळी तो पुन्हा खडकांच्या सहाय्याने वर येण्याचा प्रयत्न करत होता. दोन वेळा त्याने पोहत खडकांजवळ येण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा जोरदार प्रवाहाने त्याचा हात खडकांवरून निसटत होता. बघता बघता तो दरीत वाहून गेला. हे सारं त्याच्या मुलीच्या डोळ्यादेखत घडले. ती आपल्या वडिलांच्या पोहायचा तो क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत होती. पण, या कॅमेरासमोर अन् मुलीच्या डोळ्यांदेखत तिचे वडील पाण्यातून वाहत दरीत गेले.
या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ काढ असे मुलीला सांगितले…
ताम्हिणी घाटातून सर्वजण निघण्याच्या तयारीत असताना स्वप्नील यांनी आपल्या मुलीला आणखी एक व्हिडिओ काढ असे सांगितले. तेव्हा त्यांनी पाण्यात उडी मारली. पण, पाण्यातून परत येण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरातील प्लस व्हॅलीच्या परिसरातील पाण्याच्या कुंडात शनिवारी (दि. २९) दुपारी वाहून गेलेल्या स्वप्निल धावडे (वय ३८, रा. भोसरी, पिंपरी-चिंचवड) याचा ५० जणांच्या बचाव पथकाने दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. ३०) शोध घेऊनही तो सापडला नव्हता. सोमवार, दि. १ जुलै रोजी शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात आले.