David Miller: पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला धक्का! स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा? पोस्ट व्हायरल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 2 जुलै ।। आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. साखळी फेरी आणि सुपल ८ फेरीतील सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवत भारतीय संघाने फायनललमध्ये प्रवेश केला.सेमिफायनलमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव केला. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेनेही स्पर्धेतील सर्व सामने जिंकले. सेमिफायनलमध्ये अफगाणिस्तानचा एकतर्फी पराभव केला आणि फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र फायनलमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

फायनलच्या सामन्यात हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं होतं.मात्र शेवट दोघेही बाद झाल्याने हातात असलेला सामना दक्षिण आफ्रिकेच्या हातून निसटला. दरम्यान या पराभवानंतर डेव्हिड मिलरने एक भावुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.

डेव्हिड मिलरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत लिहीले की, ‘मी खुप दु:खी आहे. दोन दिवसांपूर्वी ज झालं, ते पचवणं खूप कठीण आहे. मला आता काय वाटतंय हे मी शब्दात सांगु शकत नाही.’ यानंतर त्याने संघातील खेळाडूंचं कौतुक केलं. हा प्रवास शानदार होता. पूर्ण महिन्यात अनेत चढउतार आले. मात्र हेच वाटतं की,आमचा संघ मजबूत आहे.’ मिलरच्या या पोस्टनंतर त्याने निवृत्ती जाहीर केलीय का? अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

भारतीय संघाचा विजय
बारबाडोसच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीला भारतीय संघाला मोठे धक्के दिले. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून ७२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या १७६ धावांपर्यंत पोहोचवली.

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १७७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून हेनरीक क्लासेनने अर्धशतकी खेळी केली आणि संघाला विजयाच्या जवळ पोहोचवलं. शेवटी डेव्हिड मिलरने भारतीय संघाकडून विजय हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *