महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुलै ।। साजूक तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. विविध पदार्थ बनवताना त्यात तूप हमखास वापरलं जातं. त्याने आपल्या शरीराला मोठ्याप्रमाणात प्रोटीन सुद्धा मिळतात. घरी तूप बनवण्याची प्रोसेस थोडी वेळखाऊ आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये बाजारातील विविध ब्रँडचे तूप वापरले जाते. मात्र सध्या बाजारात कोणताच पदार्थ शुद्ध किंवा भेसळविरहीत मिळत नाही. दूधाप्रमाणे अनेक व्यक्ती तूपामध्ये सुद्धा भेसळ करतात. त्यामुळे आज तूप शुद्ध आहे की भेसळयुक्त, ते कसं ओळखायचं? याची माहिती जाणून घेऊ.
पाणी
शुद्ध तूप ओळखण्यासाठी तुम्हाला पाणी मोठी मदत करेल. त्यासाठी एक ग्लास पाणी घ्या. या पाण्यात एक चमचा तूप टाका. तूप शुद्ध असेल तर ते पाण्यावर तरंगताना दिसेल. तसेच जर भेसळयुक्त तूप असेल तर ते ग्लासमधील पाण्यात तळाला जाईल. असं तूप आपल्या आरोग्यासाठी हानिकारक सुद्धा आहे.
तूप उकळून तपासा
तूप शुद्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी एका लहान भांड्यात तुम्ही वापरत असलेलं तूप घ्या. त्याला एक उकळी काढून घ्या. त्यानंतर नॉर्मल टेंपरेचरवर हे तूप एका काचेच्या बॉटलमध्ये भरून घ्या. ही बॉटल फ्रिजमध्ये ठेवून द्या. तूप पुन्हा घट्ट झाल्यावर यात जर भेसळ असेल तर दोन वेगळे लेअर दिसतात.
आयोडिन टेस्ट
आयोडिनने तुपाची शूद्धता तपासण्यासाठी आधी एका वाटीत तूप घ्या. त्यामध्ये आयोडिनचे काही ड्रॉप मिक्स करा. मिक्स केलेलं मिश्रण एकूण २० मिनिटांसाठी तसंच ठेवा. त्यानंतर जर तुपाला लाल किंवा निळा रंग आला तर हे तूप अशुद्ध आहे. तसेच जर रंग बदलला नाही तर तूप शुद्ध आहे.
तळहातावर टेस्ट करा
तळहातावर एक चमचा तूप घ्या. घे तूप जर शुद्ध असेल तर हातावरून हळूहळू खाली घसरेल. तसेच तुपात भेसळ असेल तर तूप हाताला चिकटून राहते.
HCL टेस्ट
HCL टेस्टने सुद्धा शुद्ध आणि भेसळयुक्त तूप ओळखता येतं. त्यासाठी एका भांड्यात किंवा मग काचेच्या टेस्ट ट्यूबमध्ये तूप घ्या. त्यामध्ये हाइड्रोक्लोरिक अॅसिड मिक्स करा. त्यानंतर याचा रंग बदलला तर समजून जा तूप भेसळयुक्त आहे.
तुपातील भेसळ ओळखण्याबाबतच्या या टिप्स The Better India ने एक व्हिडिओ पोस्ट करत सांगितल्या आहेत. सध्या त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील हा व्हिडिओ व्हायरल होतोय.