महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुलै ।। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे नीरा नदीमध्ये पवित्र स्नान पार पडले. माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये शाही स्नान घालण्यात आले. पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. माऊली माऊली च्या जयघोषात पालखिला स्नान घालण्यात आलं आहे. आज पासूनच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर 24 तास दर्शनासाठी सुरू राहणार आहे. भाविकांना आता विठ्ठल रुक्मिणीच्या पदर्पर्शांचे २४ तास दर्शन घेता येणार आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने मंदिर समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी देवाचा पलंग काढून 24 तास दर्शनाला सुरुवात होणार आहे. 21 जुलै पर्यंत विठुरायाचे दर्शन 24 तास सुरू राहणार आहे.