महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुलै ।। खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) दत्त मंदिराजवळ कंटेनर बंद पडल्याने आज सकाळी सात वाजेपासून सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली. तद्नंतर तासाभरातच बोगद्यातून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही ठप्प झाल्याने आज सकाळपासून दोन्ही बाजूकडे वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.
यामुळे लोणंदला जाणारे वारकरी या ट्राफिक जाममध्ये अडकले आहेत. याबाबत माहिती अशी, की आज सकाळी दत्त मंदिराजवळ कंटेनर बंद पडल्याने हळूहळू वाहनांची संख्या वाढत गेली, यामुळे आज (रविवार) रस्त्यावर वाहनांची संख्या अधिक होऊन वाहतूक ठप्प झाली.
तर, काहींनी बोगद्या मार्गे आपली वाहने वळवली. दरम्यान, बोगद्याकडून येणारी वाहतूक ही टप्पे झाली. परिणामी, सकाळी सात वाजेपासून आज दुपारपर्यंत वाहतूक टप्पू झाली आहे. तसेच हे चित्र दिवसभर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.