महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 8 जुलै ।। डिव्हाईन इंटरनॅशनल फ्यूचर ट्रान्सफॉर्मेशन DIFT फाऊंडेशन व डिफेंस फोर्स लीग च्या वतीने पिंपरी चिंचवडमध्ये कारगिल विजयाचा रजत महोत्सव साजरा करण्यात आला. दीनांक ७ जुलै रविवारी हॉटेल कलासागर मध्ये या निमित्त “डिव्हाईन हिंदुस्तान प्राइड अवॉर्ड” समारंभाचे आयोजन केले होते , ज्यात कारगिल युद्धातील सर्वोच्च वीरता सन्मान “ परमवीरचक्र विजेते – सुबेदार मेजर संजय कुमार” यांच्या उपस्थितीत DIFT फाऊंडेशन च्या उद्घाटनासह भव्य असा पुरस्कार सोहळा पार पडला.
या प्रसंगी DFL अवार्ड्स तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पूर्व सैन्यअधिकाऱ्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला ज्यात विद्यापीठांचे कुलपति, डायरेक्टर, पालिकेतील अधिकारी, औद्योगिक, क्रीडा , राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होते.
या समारंभात “राष्ट्रीय शिक्षा धोरण – NEP 20” वर NETF व NAAC चेअरमन डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी आपले विचार मांडले. इस्रो सायंटिस्ट डॉ. अरुण कुमार सिन्हा, जनसेवक श्री नीलेश दादा नेवाळे समवेत भारतीय सेनेतील विविध दिग्गज या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ASM ग्रुप ऑफ इंस्टीट्यूटस चे चेअरमन डॉ. संदीप पाचपांडे यांना परमवीरचक्र सुबेदार मेजर संजय कुमार प्राइड अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले, प्रसंगी एमप्रॉस् इंटरनॅशनल स्कूल च्या NCC कडेट्स व OCA कडेट्स ने मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत केले.
हिंदुस्तान प्राइड अवॉर्ड मध्ये – “ Unacademy सेंटर मॅनेजर आकाश राहानगडळे, पिंपरी चिंचवड यूनिवर्सिटी वाइस चॅन्सलर डॉ. माणिमाला पुरी , सीमबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल यूनिवर्सिटी वाइस चॅन्सलर डॉ राजेश इंगळे , सुधारणा सर्विस ट्रस्ट लातूर चे चेअरमन प्रशांत परळकर, कृष्णा असोशिएट चे अनिल जगताप, इंजीनियर रोहिणी काळभोर , समृद्धी एकबोटे, उद्योजक प्रशांत पवार, उद्योजक छगन राठोड, समाजसेवक निखिल बोराडे, PCMC अधिकारी अण्णासाहेब बोधडे, दिव्यांग संस्थेचे सुनील चोरडिया, कोल्हापूर चे माजी महापोर सागर चव्हाण, टेंट डीलर वेलफेर असोसिएशन चे नितीन गवळी, डी वाय पाटील कॉलेज पिंपरी मधील डॉ मानसी कुरतकोटी, लेखिका डॉ भाग्यश्री देशपांडे, आर्टिस्ट मधुरा पवार , टेलिविजन अभिनेता विनायक सोनी , मॉडेल सोनाली भालेराव व रूपाली , बॉक्सर कॅप्टन गोपाल देवांग , बॉडीबिल्डर संग्राम चौगुले, एफरो एशियन व अफगाणी स्टूडेंट्स कनेक्शन चे प्रेसिडेंट वाली रहमान रहमाणी, हॉटेल मॅनेजर प्रसाद मोरे, CA अरविन्द भोसले, फॅशन फोटोग्राफर कोमल मोजीद्रा , संजय अडसुळे, बिल्डर संजय पवार, सांनीलकुमार कुट्टी” यांचा समावेश होता.
या वेळी विशेष वॉक फॉर प्राइड मध्ये परमवीरचक्र सुबेदार मेजर संजय कुमार समेत , पैरालेसिस असतानाही कारगिल योद्धा सुबेदार मेजर मोहन पाटील व battle मधे २ पाय गमावलेले सुबेदार अनिल तरळ यांनी जेव्हा स्टेज वर वॉक केला तेव्हा सर्व लोकांमध्ये एकच जोश निर्माण झाला.
या उत्सवाचे आयोजन DIFT फाऊंडेशन व डिफेंस फोर्स लीग च्या वतीने संस्थापक नरेश गोल्ला, प्रेसिडेंट – एक्स पैरा कमांडो रघुनाथ सावंत, डायरेक्टर – सुनील वडमारे, कु. दृष्टी जैन DFL टेक्नॉलॉजी चे राजेंद्र जाधव, नीलेश विसपुते, एक्स सुबेदार मेजर यशवंत महाडीक, DFL अवार्ड्स चे सिददाराम बिराजदार, मूजीब खान, ऋषिकेश जाधव, कोमल मोजिद्रा यांनी केले होते.