NCP News: आज राष्ट्रवादी पक्षाच्या नाव आणि चिन्हावर सुनावणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जुलै ।। NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणारे. शरद पवार यांच्या वतीने मागच्या सुनावणीवेळी अजित पवार हे प्रचारात शरद पवार यांचा फोटो वापरत असल्याचा दावा केला होता. त्यावर कोर्टाने कडक ताशेरे ओढत अजित पवार यांना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशी जाहिरात वृत्तपत्रात देण्याचे आदेश दिले होते. सोबतच नागालँड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना अपात्र न केल्याचा विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधत दाखल केलेल्या याचिकेवरही आजच सुनावणी होणार आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने या प्रकरणी नोटीस जारी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *