महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुलै ।। पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाच्या पडझडीनंतर अजित पवार यांनी बोलावली आजी-माजी नगरसेवकांची बैठक. पुण्यात नवीन सर्किट हाऊसला गुरुवारी (18 जुलै 2024 रोजी) सकाळी 8 वाजता बैठक होणार आहे. पक्ष संघटना टिकवण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. शहराध्यक्ष पदाच्या निवडी बाबत ही चर्चा होणार असून नाना काटे, भाऊसाहेब भोईर जगदीश शेट्टी, शाम लांडे सतिश दरेकर शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.