इनरव्हिल क्लब पिंपरीच्या अध्यक्षपदी शालिनी चोप्रा यांची निवड.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९जुलै ।। इनरव्हिल क्लब पिंपरीचा पदग्रहण सोहळा रविवार दि. 14 जुलै रोजी सीजन बँक्वेट आकुर्डी येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा 313 च्या जिल्हाध्यक्ष डॉ. शोभना पालेकर उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा 313 च्या माजी जिल्हाध्यक्ष मंजू शर्मा उपस्थित होत्या. यावेळी 2024- 25 या वर्षासाठी पिंपरी क्लबच्या माजी अध्यक्षा अर्चना राठोड यांनी शालिनी चोप्रा यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली. शालिनी चोप्रा या साध्या गृहिणी पासून ते लघुउद्योजिका अशी मजल मारली आहे. यावर्षी त्यांनी पिंपरी क्लबचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. यावेळी नवनिर्वाचीत समितीला संदेश देताना डॉ. शोभना पालेकर म्हणाल्या की, “सध्या स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. गर्भाशयाचा आणि स्तनाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात स्त्रियांमध्ये आढळून येतो. याबद्दल समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. 9 ते 14 या वयोगटातील मुलींना जर लस दिली तर, या आजारावर प्रतिबंध करण्यास सोपे जाईल. त्याच बरोबर ट्रान्स जेंडर यावर काम करणे ही काळाची गरज आहे. याबद्दलची जनजागृती समाजात होणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे काम यावर्षी केले पाहिजे.”

नवनिर्वाचीत अध्यक्षा शालिनी चोप्रा आपल्या मनोगतात म्हणाल्या की, “यावर्षी क्लबच्या वतीने निधी उभारणीसाठी डॉक्टर ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात येणार आहे. या निधीतून मिळालेली रक्कम ही कॅन्सर पेशंट साठी दान करण्यात येईल.”

या कार्यक्रमाच्या संयोजनात, मनिष चोप्रा, तन्वी चोप्रा, उदित चोप्रा, यांचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर सुभाष ग्रोव्हर, रोहित ग्रोव्हर, अजय दीक्षित, वैशाली जैन, आनंदीता मुखर्जी, दिपाली पाटेकर, मोहिनी गोयल, मधु बवेजा, अंजली कुलकर्णी, तसेच इनरव्हील सभासदांचे कुटुंबीय उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम मेहता आणि विनिता अरोरा यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मंजू शर्मा यांनी मानले.

2024-25 कार्यकारिणी समिती
अध्यक्ष- शालिनी चोप्रा
आय. पी. पी. – अर्चना राठोड
उपाध्यक्ष – मंजू शर्मा
सचिव – मधुरा प्रधान
खजिनदार – सविता इंगळे
आय. एस. ओ. – स्मिता टिळेकर
संपादक – विनिता अरोरा
क्लब करस्पॉडन्स – सुकन्या चावला
प्रोजेक्ट मॅनेजर – मनिषा समर्थ, अनुराधा सूद, वैशाली शहा
सल्लागार – हंसा मोहन, संगीता देशपांडे, बेला अगरवाल,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *