महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९जुलै ।। झिका रुग्णांच्या संख्येत सातसात्याने वाढ होत असल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सध्या पुण्यात झिकाच्या रुग्णांची (Pune Zika Virus) संख्या एकूण संख्या 28 वर पोहोचली आहे. तसेच झिका वायरसची लक्षण आढळल्यास तातडीने तपासणी करण्याचे आवाहन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. झिका रोग हा मच्छर चावल्याने होतो,त्यामुळे घर आणि परिसरात मच्छर होणार नाहीत याची काळजी घेण्याचे पालिकेकडून सूचना देण्यात आल्या आहेत.