“उत्तर भारतीयांच्या नादी लागू नका, अन्यथा…”; अबु आझमींचा नाव न घेता कोणावर निशाणा ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुलै ।। इथले लोक आम्हाला मते देत नाहीत. तुम्हीच लोक आहात जे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला जिंकवता. माझ्यासोबत राहा, कुणी माई का लाल मुंबईत तुमच्या केसांना धक्का लावू शकत नाही. उत्तर भारतीयांच्या नादाला लागू नका, जोपर्यंत प्रेमाने वागतात तोपर्यंत ठीक अन्यथा उचलून बत्तीशी बाहेर काढू असा इशारा देत समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी नाव न घेता निशाणा साधला.

समाजवादी पक्षाच्या नवनियुक्त ३६ खासदारांचा मुंबईत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अबु आझमींनी महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यावर भाष्य केले. अबु आझमी म्हणाले की, जेव्हा उत्तर भारतीयांवर अन्याय होतो तेव्हा कोण उभा राहतो? आम्हाला सरकार सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना देते. मी तर केवळ लाठी मागितली होती. मारू नका पण मारही खावू नका असं म्हटलं. तेव्हा माझ्यावर गुन्हे दाखल झाले. तो बोलला तलवार वाटू पण मर्दांसमोर तलवारीचं महत्त्व काय, ही काठी गांधींची आहे जी भल्याभल्यांना ठीक करते असं त्यांनी म्हटलं.

त्याशिवाय आता निवडणुका होणार आहेत. माझा टॅम्पो हाय आहे, यंदा जबरदस्त निवडणूक लढणार आहोत. समाजवादी पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवायचा आहे. माझ्यासोबत राहा, जेव्हा आमच्या लोकांवर हल्ला केला जातो. तेव्हा कुणी तुमच्या मदतीला आलं नाही. मी त्या व्यक्तीचं नाव घेऊन तोंड खराब करू इच्छित नाही. त्याने किती उत्तर भारतीयांना मारलं, दुकाने फोडली, हत्याही झाली मात्र तो कधी जेलला गेला का, एकदा मला गृहमंत्री बनवा, एकदा बनलो ना अनेकांना त्यांची नानी आठवेल असं सांगत आझमींनी राज ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *