विश्वविक्रम! Charlie Cassell ने वन डे पदार्पण गाजवले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै ।। Scotland Charlie Cassell World Record : स्कॉटलंडचा गोलंदाज चार्ली कॅसेल याने सोमवारी ICC Men’s Cricket World Cup League 2 स्पर्धेच्या लढतीत वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. ओमानविरुद्धच्या या सामन्यात चार्लीने ३४ चेंडूंत सामन्याला कलाटणी दिली आणि विश्वविक्रमी कामगिरी केली. आतंरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये एकाही गोलंदाजाला पदार्पणात जे आतापर्यंत करता आले नव्हते ते स्कॉटलंडच्या खेळाडूने करून दाखवले. त्याच्या या अविश्वसनीय स्पेलमुळे स्कॉटलंडने १७.२ षटकांत हा वन डे सामना जिंकला.

चार्ली कॅसेलने सोमवारी स्कॉटलंडकडून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आपलं नाव क्रिकेटच्या इतिहास पुस्तिकेत नोंदवले. वन डे क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात ७ विकेट्स घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने कागिसो रबाडाचा पदार्पणात सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा विक्रमही मोडला. ओमानविरुद्धच्या लढतीत चार्लीने ५.४ पैकी १ षटक निर्धाव टाकून २१ धावा देताना ७ विकेट्स घेतल्या. आतापर्यंत एकाही गोलंदाजाला वन डे पदार्पणात ७ विकेट्स घेता आल्या नव्हत्या. दक्षिण आफ्रिकेच्या रबाडाने २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्ध १६ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यापूर्वी २००३ मध्ये वेस्ट इंडिजच्या फिडेल एडवर्ड्सने झिम्बाब्वेविरुद्ध २२ धावांत ६ विकेट्स घेतलेल्या.

संलग्न देशाकडून पुरुषांच्या वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी

७/१८ – राशिद खान ( अफगाणिस्तान) वि. वेस्ट इंडिज, २०१७

७/२१ – चार्ली कॅसेल ( स्कॉटलंड) वि. ओमान, २०२४

७/३२ – अली खान ( अमेरिका) वि. जर्सी, २०२३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *