महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुलै ।। काल अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरांमध्ये आज देखील मोठी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किंमती सुद्धा कमी झाल्या आहेत. अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवर 6% सीमाशुल्क कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आजचा सोने आणि चांदीचा भाव किती आहे. याची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
२२ कॅरेटचा भाव
आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव ६,५१,००० रुपये आहे. तर १० ग्राम म्हणजे १ तोळा सोन्याचा भाव ६५,१०० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ५२,०८० रुपये इतका आहे. तर १ ग्राम सोन्याचा भाव ६,५१० रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव
आज २४ कॅरेट १०० ग्राम सोन्याचे दर ७,१०,१०० रुपये, १० ग्राम म्हणजे १ तोळा सोन्याचा भाव ७१,०१० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ५६,८०८ रुपये इतका आहे. तर १ ग्राम सोन्याचा भाव ७,१०१ रुपये इतका आहे.
१८ कॅरेट सोन्याच्या किंमती
१८ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव ५,३२,७०० रुपये इतका आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव ५३,२७० रुपये आहे. तसेच ८ ग्राम सोन्याचा भाव ४२,६१६ रुपये इतका आहे. तसेच १ ग्राम सोन्याची किंमत ५,३२७ रुपये इतकी आहे.
विविध शहरांतील भाव
मुंबईमध्ये १ ग्राम सोन्याचा भाव
२२ कॅरेट ६,४९५ रुपये, २४ कॅरेट ७,०८६ रुपये आणि १८ कॅरेट ५,३१४ रुपये.
पुण्यामध्ये १ ग्राम सोन्याचा भाव
२२ कॅरेट ६,४९५ रुपये, २४ कॅरेट ७,०८६ रुपये आणि १८ कॅरेट ५,३१४ रुपये.
अहमदाबादमध्ये १ ग्राम सोन्याचा भाव
२२ कॅरेट ६,५०० रुपये, २४ कॅरेट ७,०९१ रुपये आणि १८ कॅरेट ५,३१८ रुपये.
नवी दिल्लीमध्ये १ ग्राम सोन्याचा भाव
२२ कॅरेट ६,५१० रुपये, २४ कॅरेट ७,१०१ रुपये आणि १८ कॅरेट ५,३१८ रुपये.
कोलकत्तामध्ये १ ग्राम सोन्याचा भाव
२२ कॅरेट ६,४९५ रुपये, २४ कॅरेट ७,०८६ रुपये आणि १८ कॅरेट ५,३१४ रुपये.
चांदीच्या आजच्या किंमती किती?
आज चांदीच्या किंमती ५०० रुपयांनी घसरल्या आहेत. त्यामुळे चांदीचा भाव ८७,५०० रुपये किलो इतका आहे. मुंबई पुण्यासह आज विविध शहरांमध्ये देखील चांदी याच भावाने विकली जात आहे.