महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुलै ।। सोमवारपासून सलग चौथ्या दिवशी देखील सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. सोन्याचा भाव वाढणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याचे दर आणखी कमी होणार अशी शक्यता आहे. अशात आज देखील सोने तसेच चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे आजचा भाव काय आहे? याची माहिती जाणून घेऊ.
आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव
आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. यामध्ये १०० ग्राम सोन्याचा भाव आज ६,५०,९०० रुपये आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव ६५,०९० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५२,०७२ रुपये आहे. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ६,५०९ रुपये आहे.
२४ कॅरेटचा भाव
२४ कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा आज किरकोळ आकड्यांनी कमी झाला आहे. यामध्ये १०० ग्राम सोन्याची किंमत ७,१०,००० रुपये इतकी किंमत आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव ७१,००० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ५६,८०० रुपये आहे. तर १ ग्राम सोन्याचा भाव ७,१०० रुपये इतका आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव
आज १८ कॅरेट सोन्याच्या दरांत सुद्धा घसरण झाली आहे. १०० ग्राम सोन्याचा भाव आज ५,३२,६०० रुपये आहे. १० ग्राम सोन्याचा भाव ५३,२६० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ४२,६०८ रुपये आहे. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव आज ५,३२६ रुपये इतका आहे.
विविध शहरांमधील घसरलेल्या किंमती
आज मुंबईमध्ये २२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ६,४९४ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,०८५ रुपये आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,३१३ रुपये आहे.
पुण्यामध्ये १ ग्राम सोन्याचा भाव
२२ कॅरेट सोन्याचा भाव ६,४९४ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,०८५ रुपये आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,३१३ रुपये आहे.
अहमदाबादमधील किंमती
२२ कॅरेट सोन्याचा भाव ६,४९९ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,०९० रुपये आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,३१९ रुपये आहे.
कोलकत्तामधील किंमत
२२ कॅरेट सोन्याचा भाव ६,४९४ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,०८५ रुपये आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,३१३ रुपये आहे.
लखनऊमधील सोन्याचा भाव
२२ कॅरेट सोन्याचा भाव ६,५०९ रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,१०० रुपये आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,३२६ रुपये आहे.
चांदीच्या किंमती किती?
आज चांदीच्या किंमतीमध्ये देखील घसरण झाली आहे. १ किलो चांदीच्या किंमती १०० रुपयांनी कमी झाल्यात. काल हाच भाव ८७,५०० रुपये आहे. तर आजचा भाव ८७,४०० रुपये किलो इतका आहे.
मुंबईमधील चांदीचा भाव – ८७,४०० रुपये किलो
पुण्यातील चांदीचा भाव – ८७,४०० रुपये किलो
नवी दिल्लीमधील चांदीचा भाव – ८७,४०० रुपये किलो
पटनामध्ये चांदीचा भाव – ८७,४०० रुपये किलो
कोलकत्तामध्ये चांदीचा भाव – ८७,४०० रुपये किलो
मेरठमध्ये चांदीचा भाव – ८७,४०० रुपये किलो
लुधियानात चांदीचा भाव – ८७,४०० रुपये किलो