महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑगस्ट ।। मोबाईलवर येणारे स्पॅम कॉल हे सगळ्यांच्या त्रासाचे कारण आहे. एखाद्या महत्वाच्या कामात असताना किंवा विश्रांती घेत असताना हे कॉल येऊन त्रास देतात. त्यातल्या काही कॉल तर फसवणुकीच्यासुद्धा असू शकतात. पण या स्पॅम कॉलपासून वाचण्यासाठी काय करायचं? तुमच्या Android फोनवर तुम्ही या कॉल ब्लॉक करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कशी करायची आहे स्पॅम कॉल ब्लॉक.
याच्या काही सोप्या पद्धती आहेत.
DND सेवा सक्रिय करा (Do Not Disturb)
मोबाईलमध्ये असलेल्या SMS App मध्ये जा आणि “START” टाईप करून 1909 या नंबरवर पाठवा.
तुम्हाला बँकिंग, हॉस्पिटॅलिटीसारख्या विविध श्रेणींची लिस्ट मिळेल. प्रत्येक श्रेणीला वेगळा कोड असतो.
तुम्हाला कोणत्या प्रकारचे कॉल ब्लॉक करायचे आहेत त्या श्रेणीचा कोड पाठवा.
प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल आणि 24 तासांच्या आत DND सेवा सुरु होईल.
ही सेवा थर्ड पार्टीच्या अनधिकृत व्यावसायिक कॉल ब्लॉक करण्यात प्रभावी आहे. पण बँका किंवा इतर महत्वाच्या सेवांच्या माहितीच्या मेसेजवर याचा परिणाम होणार नाही.
तुमच्या सिम कार्ड कंपनीच्या माध्यमातून DND सेवा सक्रिय करा
तुम्ही तुमच्या सिम कार्ड कंपनीच्या App द्वारेही DND सेवा सुरु करू शकता. (Jio, Airtel, Vi, BSNL यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत)
तुम्ही ज्या नंबरवरून स्पॅम कॉल येतात ते नंबर ब्लॉक करू शकता.
Phone App मध्ये जा आणि Call History मध्ये जा.
स्पॅम नंबरवर काही सेकंद थांबा आणि “Block” किंवा “Report” निवडा.
ही पद्धत उपयुक्त आहे पण स्पॅम कॉलर्स वेगवेगळे नंबर वापरतात त्यामुळे मर्यादा आहेत.
अज्ञात किंवा संशयास्पद कॉल फिल्टर करा.
Android मध्ये असा पर्याय आहे ज्याद्वारे अज्ञात किंवा संशयास्पद स्पॅम कॉल स्वयंचलितपणे फिल्टर करता येतात.
Phone App मध्ये जा आणि Settings मध्ये जा.
“Caller ID & Spam” निवडा आणि “Filter spam calls” आणि “See caller & spam ID” हे पर्याय चालू करा.
हे फीचर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या नंबरवरून येणारे कॉल ब्लॉक करण्यास मदत करते.
या सोप्या पद्धतींचा वापर करून तुम्ही स्पॅम कॉलचा त्रास कमी करू शकता आणि तुमचा वेळ वाचवू शकता.