Horoscope Today दि. २१ मार्च २०२६ ; आज कामातून लाभ होईल.. …. ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ मार्च २०२६ ।।

मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope)
तुमचे व्यक्तिमत्व उठावदार ठरेल. प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीने पहाल. चारचौघात मिळून मिसळून वागाल. करमणुकीचे कार्यक्रम ठरवाल. हौसेला अधिक महत्व द्याल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope)
मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी मनात नसतांना कराव्या लागतील. पत्नीची उत्तम साथ मिळेल. प्रेमसंबंधाच्या बाबतीत जपून राहावे. काही गोष्टींची गुप्तता पाळाल.

मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope)
इतरांना सहृदयतेने मदत कराल. नवीन लोकांशी मैत्री कराल. स्त्रियांच्या ओळखीने कामे पार पडतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. तुमची समाजप्रियता वाढेल.

कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope)
औद्योगिक वातावरण चांगले राहील. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. आवडीचे खाद्यपदार्थ खाल. घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चैनीच्या वस्तूंची आवड दर्शवाल.

सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope)
परोपकारी वृत्तीने मदत कराल. वाचनाची आवड जोपासाल. अंगीभूत कलेला पोषक वातावरण मिळेल. धार्मिक कामात मदतीचा हात पुढे कराल. शैक्षणिक अडचण दूर होईल.

कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope)
काही कामे कमी वेळेत पूर्ण होतील. सासुरवाडीचे लोक भेटतील. सांपत्तिक दर्जा सुधारेल. वारसा हक्काच्या कामातून लाभ होईल.

तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope)
जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. भागीदाराशी एकोपा वाढवावा. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा मान मिळेल. वैवाहिक सौख्य वाढेल. एकमेकांशी समजूतदारपणे वागाल.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope)
कामात क्षुल्लक कारणाने अडचणी येऊ शकतात. उधार-उसनवारीचे व्यवहार करू नयेत. आपल्या कडून कोणीही दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. दूरगामी विचारांना चालना द्यावी.

धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope)
डावपेच आखूनच वाटचाल कराल. प्रलोभनाला बळी पडू नका. ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. बोलतांना आवेग आवरता घ्यावा. दिखाऊपणाला भुलून जाऊ नका.

मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope)
कामात अधिक जोम येईल. सुप्त कलागुणांना वाव द्यावा. प्रतिष्ठितांच्या भेटीचा योग येईल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी केल्या जातील. कुलदेवतेची आराधना करावी.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope)
सामुदायिक वादात अडकू नका. पारमार्थिक बळ वाढवाल. गप्पिष्ट लोकांच्यात वेळ घालवाल. आपले मत उत्तम प्रकारे मांडाल. घरात नातेवाईक गोळा होतील.

मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope)
मुलांच्या हट्टाला बळी पडाल. मानसिक ताण वाढू शकतो. कामात गतीमानता येईल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. मानसिक चंचलतेवर मात करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *