महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑगस्ट ।। इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. ३१ जुलैपर्यंत जवळपास ७ कोटींहून अधिक करदात्यांनी आयटीआर फाइल केला आहे. परंतु ज्या करदात्यांनी अजूनही आयटीआर फाइल केला नाही त्यांना दंड भरावा लागणार आहे. जर तुम्ही आयटीआर भरला नसेल तर तुम्हाला जेलदेखील होऊ शकते.
आयकर रिटर्न भरण्याची मुदत आता संपली आहे. ज्या लोकांनी आयटीआर भरले नाही ते लोक ३१ डिसेंबरपर्यंत आयटीआर भरु शकतात. परंतु त्यांना यासाठी दंड भरावा लागणार आहे. यालाच बिलेटेड म्हणजेच विलंबित आयकर रिटर्न म्हणतात. हा आयटीआर फाइल करताना तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. तसेच कराच्या रक्कमेवर व्याजदेखील भरावे लागणार आहे. प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम 234F नुसार, विलंबित रिटर्न फाइल करताना करावर दरमहिन्याला १ टक्के व्याज भरावे लागेल.
दंड किती भरावा लागणार?
कलम 234F नुसार, बिलेटेड रिटर्न भरण्याचा दंड करदात्यांच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित असतो. जर करदात्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यांना आयटीआर फाइल करताना १,००० रुपये दंड भरावा लागणार आहे. तर ज्या करदात्यांचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना ५,००० रुपये आहे.
ITR Filling
ITR Filing Deadline: कोणते करदाते अंतिम मुदतीनंतरही इन्कम टॅक्स रिटर्न्स भरू शकतील?
आयटीआर फाइल न केल्यास काय होईल?
आयटीआर फाइल न केल्यास करदात्यांना दंड भरावा लागणार आहे. जो करदाता आयटीआर रिटर्न फाइल करणार नाही त्याला आपल्या चालू वर्षाचा लॉस कॅरी फॉरवर्ड करता येणार नाही. याशिवाय आकर विभाग दंड ठोठावू शकतो. हा दंड कराच्या ५०% ते 200% पर्यंत असू शकतो. उच्च मूल्याच्या प्रकरणांमध्ये रिटर्न फाइल न केल्यास न्यायालयीन कारवाई किंवा तुरुंगवासही होऊ शकतो.