महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑगस्ट ।। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका ट्विटमुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे. संसदेमध्ये आपण केलेले भाषण आवडले नाही. त्यामुळे माझ्यावर ईडीची कारवाई होणार आहे, असा सूचक इशारा राहुल गांधी यांनी दिलेला आहे. राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलंय की, मी संसदेत केलेलं चक्रव्यूह भाषण दोघांमधील एकाला आवडलेलं नाही. त्यामुळे आता ईडीने माझ्यावर छापेमारी करण्याची तयारी केलीय. मोकळ्या हातांनी चहा आणि बिस्कीटांसह वाट पाहत असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
आता राहुल गांधी यांच्या या दाव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खरंच, राहुल गंधी यांच्यावर ईडीची छापेमारी होणार का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात बोलताना ९ जुलै रोजी राहुल गांधी यांनी महाभारतातील चक्रव्यूहचा संदर्भ दिला होता. ते चक्र कमळाच्या आकाराचं होतं, आता देखील एक नवं चक्रव्यूह तयार होतंय, अशी टीका त्यांनी केली होती.