Sheikh Hasina: ‘तो’ विश्वासघात करणार ! भारतानं हसीनांना आधीच इशारा दिलेला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ ऑगस्ट ।। भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशात सध्याच्या घडीला प्रचंड हिंसाचार माजला असून देशभरात अराजकाची स्थिती आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडलेला आहे. त्या सोमवारी संध्याकाळी भारतात आल्या. त्यांचा मुक्काम सध्या दिल्लीतील अज्ञातस्थळी असून त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे.

शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर लष्करप्रमुख वकार उज झमान समोर आले. बांगलादेशात झालेल्या सत्तांतरात त्यांची भूमिका संशयास्पद राहिलेली आहे. वकार उज झमान यांची नियुक्ती हसीना यांनी जूनमध्ये केली होती. वकार उज झमान यांना लष्करप्रमुख करणं धोकादायक ठरु शकतं याची कल्पना भारतीय अधिकाऱ्यांनी हसीना यांना दिलेली होती. पण हसीना यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांचा हा निर्णय चुकला आणि हेच त्यांची सत्ता जाण्यामागचं प्रमुख कारण ठरलं.

देशातले तरुण रस्त्यावर उतरले असताना लष्करप्रमुख झमान यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याऐवजी शेख यांनाच अल्टिमेटम दिला. हसीना आणि त्यांच्या बहिणानं देश सोडून जावा, अशी मागणी झमान यांनी केली. तुरुंगात असलेल्या बांगलादेश नॅशनल पार्टीच्या नेत्या खलीदा झिया यांची सुटका करण्याचा निर्णय लष्करानं घेतला. यावरुन बांगलादेशात जमात-ए-इस्लामी आणि इस्लामी छात्र शिबिराचा प्रभाव वाढल्याचं स्पष्टपणे दिसलं.

बांगलादेशातील परिेस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देश सोडून त्या भारतात आल्या. यानंतर झमान पुढे आले. त्यांनी देशाला संबोधित केलं. आपण देशाची जबाबदारी घेत असून लवकरच हंगामी सरकार स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. देशात कायदा सुव्यवस्था राखली जाईल, याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

वडिलांनी केलेली चूक लेकीनं केली
शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबूर रेहमान बांगलादेशचे पहिले पंतप्रधान राहिले आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. १५ ऑगस्ट १९७५ रोजी त्यांची हत्या झाली. त्यांची निवासस्थानी लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांची हत्या केली. मुजीबूर यांच्या पत्नी, भाऊ, तीन मुलं, दोन सुना यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांना संपवण्यात आलं. यावेळी शेख हसीना त्यांच्या एका बहिणीसह जर्मनीत होत्या. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

विशेष म्हणजे भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉचे तत्कालीन प्रमुख आर. एन. काव यांनी रेहमान यांना संभाव्य धोक्याची कल्पना दिलेली होती. तुमचे लष्करी अधिकार तुमच्या हत्येचा कट रचत आहेत, अशी माहिती रेहमान यांना रॉकडून देण्यात आलेली होती. पण माझी माणसं असा विश्वासघात करणार नाहीत, असं रेहमान यांनी काव यांना सांगितलं. त्यानंतर पुढील काही दिवसांतच रेहमान यांची लष्करानं हत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *