आरटीई प्रवेशासाठी उद्यापर्यंत मुदतवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ ऑगस्ट ।। शाळांतील आरटीई प्रवेशासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पालक आता संबंधित शाळांमध्ये जाऊन 8 ऑगस्टपर्यंत आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ शकतात. राज्यातील काही जिह्यांमध्ये पूरपरिस्थिती असल्यामुळे आरटीई 25 टक्के प्रवेशित बालकांच्या पालकांना कागदपत्रे पडताळणीसाठी मुदतवाढ दिली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले.

राज्यातील काही जिह्यांमध्ये पूरपरिस्थिती असल्यामुळे आरटीई 25 टक्के प्रवेशित बालकांच्या पालकांना कागदपत्रे पडताळणीकरिता घराबाहेर पडणे शक्य नसल्यामुळे पुन्हा एकदा आरटीई प्रवेशासाठी मुदत वाढवून दिल्याचे गोसावी यांनी म्हटले आहे. राज्यात आरटीई प्रवेशासाठी 9 हजार 217 शाळांमध्ये 1 लाख 5 हजार 242 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी राज्यातून 2 लाख 42 हजार 516 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी 93 हजार 9 विद्यार्थ्यांची लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड झाली आहे. प्रवेशासाठी 93 हजार 9 विद्यार्थ्यांची निवड होऊनदेखील केवळ 54 हजार 449 विद्यार्थ्यांचे आतापर्यंत प्रवेश कन्फर्म झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *