महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ ऑगस्ट ।। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, महिला कुस्तीपटू विनेश फोगट आणि मराठमोळा खेळाडू अविनाश साबळे यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. दोघांचेही फायनल सामने आज होणार असून भारताला दोन सुवर्णपदके मिळणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 3 पदके जिंकली आहेत. हे तिन्ही पदके शूटिंगमधून मिळाली आहेत. यातील दोन पदके एकट्या मनु भास्करने जिंकली आहे. मनुने आधी नेमबाजीत आणि त्यानंतर मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरे कांस्य मिळवले. तिच्यासोबत सरबज्योत सिंह देखील संघात होता.
भारताला आज 2 सुवर्णपदकं मिळणार? विनेश फोगट-अविनाश साबळेकडे सर्वांच्या नजरा; कसं असणार वेळापत्रक?
Bajrang Punia Post : तिला देशात लाथांनी चिरडलं, फरफटत नेलं; विनेश फोगटच्या विजयावर बजरंग पुनियाची पोस्ट
दुसरीकडे मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकले. आता संपूर्ण देशाच लक्ष महिला कुस्तीपटू विनेश फोगट आणि मराठमोळा खेळाडू अविनाश साबळे यांच्याकडे आहे.
अविनाश साबळे याचा स्टीपलचेस शर्यत स्पर्धेत आज फायनल सामना होणार आहे. तर विनेश फोगटचा अंतिम सामना अमेरिकेच्या साराह ॲन हिल्ड्रेब्रँडशी होणार आहे. या दोन्ही सामन्यांकडे संपूर्ण देशवासियांच्या नजरा लागून आहे. दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये आज भारताचे सामन्यांच्या वेळापत्रकावर नजर टाकुयात…
ऑलिम्पिकमध्ये आज भारताचे सामने
ॲथलेटिक्स चालण्याचे मॅरेथॉन (पदक फेरी) प्रियांका गोस्वामी, सूरज पनवार (सकाळी ११ वाजता)
उंच उडी (पुरुषांची पात्रता फेरी) सर्वेश कुशारे (दुपारी १.३५ वाजता)
भालाफेक (महिलांची पात्रता फेरी) अन्नू राणी (दुपारी १.५५ वाजता)
महिलांची १०० मीटर अडथळा शर्यत, ज्योती याराजी (पात्रता फेरी) दुपारी २.०९ वाजता.
तिहेरी उडी (पुरुषांची पात्रता फेरी) प्रवीण चित्रावेल, अब्दुल्ला अबुबाकर रात्री १०.४५ वाजता.
स्टीपलचेस शर्यत (अंतिम फेरी) अविनाश साबळे मध्यरात्री १.१५ वाजता.
गोल्फ महिलांची पात्रता फेरी, आदिती अशोक, दीक्षा डागर दुपारी १२.३० वाजता.
टेबल टेनिस महिलांची उपांत्यपूर्व फेरी – भारत वि. जर्मनी दुपारी १.३० वाजता.
कुस्ती महिलांची अंतिम फेरी (५० किलो) विनेश फोगट विरुद्ध सारा (अंदाजे सायंकाळी ७ नंतर)
उपउपांत्यपूर्व फेरी (५३ किलो) अंतिम पंघाल वि. झेनेप येटगिल (दुपारी ३.०५ वाजता)
वेटलिफ्टिंग महिलांची अंतिम फेरी (४९ किलो) मीराबाई चानू (रात्री ११ वाजता)