Vinesh Phogat: अखेर विनेश फोगाटने मौन सोडले; म्हणाली…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑगस्ट ।। पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून विनेश फोगटच्या अपात्रतेची जगभरात चर्चा होत आहे. भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ला विनेशला वेळ देण्याची विनंती केली होती पण ती फेटाळण्यात आली. आता अखेर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने या विषयावर आपले मौन तोडले आहे.

अपात्रतेच्या या घटनेनंतर प्रशिक्षक वीरेंद्र दहिया आणि मनजीत राणी विनेशला भेटायला आले. भारतीय कुस्तीपटू विनेशने इतक्या मोठ्या घटनेनंतर धैर्य दाखवत सहज म्हणाली, “हे सर्व खेळाचा भाग आहे.” या भारतीय महिला कुस्तीपटूसाठी हा काळ खूप कठीण असेल कारण तिने पहिल्या फेरीत गत ऑलिम्पिक चॅम्पियन आणि 4 वेळा विश्वविजेती जपानच्या युई सुसाकी हिला पराभूत करून जगात खळबळ माजवली होती. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर विनेशने भारतासाठी किमान रौप्य पदक निश्चित केले होते, परंतु अपात्रतेनंतर विनेशला रिकाम्या हाताने मायदेशी परतावे लागेल.

प्रशिक्षक म्हणाले, “या बातमीने संपूर्ण भारतीय संघाला धक्का बसला. ही बातमी पसरताच मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आम्ही विनेशला सावरण्याचा प्रयत्न केला, तिनेही हे सगळं धैर्याने घेतले, विनेश आम्हाला म्हणाली, “हे फक्त दुर्दैवी होते आहे की आपण पदक जिंकले नाही, पण हा खेळाचा भाग आहे.”

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या विषयावर एक निवेदन जारी केले होते की, “महिलांच्या 50 किलो वजनी गटातून विनेश फोगटला अपात्र ठरवल्याची बातमी अत्यंत दु:खाने जाहीर करत आहे. रात्रभर अथक वजन कमी करण्याचे अथक प्रयत्नांनंतरही तिचे वजन 100 ग्रॅम अधिकच आढळून आले.” याशिवाय संघाने विनेश फोगट यांच्याबद्दलही शोक व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *