रेल्वेत लाल, पिवळा किंवा निळ्या नाही तर पांढऱ्या रंगाचेच कव्हर आणि बेडशीट का असतात? काय आहे त्यामागचं कारण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑगस्ट ।। ट्रेननं तुम्हीही प्रवास केला असेल. जर तुम्ही एसी डब्ब्यानं प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेकडून चादर, ब्लॅंकेट, उशी आणि थोडक्यात संपूर्ण बेड रोल किट मिळते. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या ट्रेनमध्ये ही सुविधा उपलब्ध असते.तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही या बेड रोलचा वापर करू शकतात. ट्रेनचं शेवटचं स्टेशन येण्याआधी ट्रेनचा कोच अटेंडेट परत येऊन ते बेड रोल घेऊन जातो.

तर हे सगळं रेल्वेनं ठरवून केलेलं आहे. खूप लांबच्या पल्ला गाठणाऱ्या ट्रेनमध्ये पांढऱ्या रंगाचा बेड रोल असणं या मागे काही कारणं आहेत. रोज ट्रेनमध्ये हजारो चादर आणि उश्यांची गरज भासते. जेव्हा त्या प्रवाशांचा प्रवास संपतो तेव्हा ते एकत्र करून त्यांना साफ करण्यात येतं. हे बेड रोल धुण्यासाठी त्यांना मोठं बॉयलर असलेल्या मशीनमध्ये धुण्यात येतं. या मशीनमध्ये 121 डिग्री सेल्सियस तापमानात धुण्यात येतात. या मशीनमध्ये चादर, कव्हर, टॉवेल सगळं काही अर्धा तासासाठी धुण्यात येतात. तर हाय टेम्परेचरमध्ये हे धुण्यात येतं. जेणेकरून कपडे पूर्णपणे सॅनिटाइज होतील.

साफ सफाईच्या या किचकट प्रक्रियेमुळे रेल्वे रंगीत चादर ऐवजी पांढऱ्या रंगाची चादरचा वापर करतात. खरंतर अशा प्रकारच्या सफाईसाठी पांढरा रंग हा योग्य आहे. त्याचं कारण म्हणजे पांढऱ्या रंगाचे कपडे हाय टेम्परेटचर, हाय डिटर्जेंट, ब्लीचिंग केल्यानंतर खूप योग्य रिझल्ट येतो. रंगीत असल्यावर कपड्यांचा रंग हा भुरकट होतो. पांढऱ्या कपड्यांवर ब्लीच करणं रंगीत कपड्यांपेक्षा खूप सोपं असतं. त्याशिवाय रंगीत असतील तर त्यांना एकमेकांचा रंग लागण्याची शक्यता वाढते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *