ई-बाईक ग्राहकांना आवडतेय; खप तब्बल ९५ टक्क्यांनी वाढला, ‘इतक्या’ वाहनांची झाली विक्री

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑगस्ट ।। जुलै २०२४ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वार्षिक आधारावर ५५.२ टक्के वाढली आहे, अशी माहिती ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’ने (फाडा) दिली आहे. ‘फाडा’च्या अहवालातील आकडेवारीनुसार, जुलै २०२४ मध्ये १,७९,०३८ ई-वाहनांची विक्री झाली.

गेल्यावर्षी १,१६,२११ ई-वाहनांची विक्री झाली होती. ई-बाईकच्या विक्रीत ९५.९४ टक्के वाढ झाली. १,०७,०१६ ई- बाईकची विक्री जुलै २०२४ मध्ये झाली.
गेल्यावर्षी याच समान कालावधीत ५४,६१६ ई-बाईक विकल्या गेल्या होत्या.
ई-तीनचाकी वाहनांच्या विक्रीत १८.१८ टक्के वाढ झाली. ६३,६६७ ई- तीनचाकी या महिन्यात विकल्या गेल्या.

दरम्यान, ई-व्यावसायिक वाहनांची विक्री दुपटीने वाढून ८१६ झाल्याचे दिसून आले आहे. ई-प्रवासी वाहनांची विक्री २.९२ टक्के घसरून ७,५४१ वाहनांवर आली.

जुनी वाहने भंगारात काढण्याची योजना धिमीच: १५ वर्षे जुनी वाहने भंगारात काढण्याच्या योजनेला अत्यल्प प्रतिसाद आहे. सध्या महिन्याला ४ हजार ते ५ हजार वाहने भंगारात येत आहेत. ९ लाख जुन्या गाड्या भंगारात काढण्याचे उद्दिष्ट गाठणे अशक्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *