करखेली येथील तरुणांनी केलेल्या स्वच्छता व वृक्षारोपण कामाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून कौतुक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – तालूका प्रतिनिधि – जीवन भोसले – दि.१३ उदगीर तालूक्यातील करखेली येथिल ग्रामस्थांनी विशेषत: येथील तरुण वर्गाने एकत्रित येऊन कोरोना महामारी प्रादुर्भावमुळे सर्व देशात लाँकडाऊन सुरू असताना लाँकडाऊन च्या सुट्याचा काळ- वेळ वाया न जाऊ देता एक वेगळाच ऊपक्रम राबवला आहे. साधारणता 1350 लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये तरूण वर्ग मोठ्या प्रमानात आहे.या तरुणांनी एकत्र येऊन लाँकडाउन काळाचा सदपयोग कशा पद्धतीने करता येतो याचे ज्वलंत उदाहरण दाखवले , लोकसहभागातून दोन लाख रुपये जमा केले व त्या निधीमधून स्वच्छता व वृक्षारोपणाची कामे हाती घेतली. या तरुणांमध्ये असलेली ऊर्जा व आपल्या गावाप्रती असलेली निष्ठा हे गुण वाखाणण्याजोगे असून या गावातील तरुणाईच्या आदर्शवत कामाची प्रेरणा जिल्ह्यातील इतर गावांनी घ्यावी, असे आवाहन राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता ,सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी , भुकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी केले.

उदगीर तालुक्यातील करखेली गावातील ग्रामस्वच्छता कामास भेट देऊन , वृक्षरोपण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी ,तहसिलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, सरपंच सौ. महादेवी भदरशेटे, उपसरपंच सौ. शिल्पाताई शिंदे उपस्थित होत्या.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की,करखेली गावातील गढीभागात तसेच संपूर्ण गावात येथील 50 ते 60 तरुण एकत्र येऊन ग्रामस्वच्छतेचे काम करत आहे.या तरुणाईने एक आदर्श निर्माण केला असून हा आदर्श व उर्जा उदगीर मतदार संघातील इतर सर्व गावांनी घ्यावा असे आवाहन करुन या कामास आमदार निधीतून 10 लाख रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा त्यांनी केली.
करखेली गावातील तरुणाईंनी वृक्षारोपण कार्यक्रम करत आहेत. ही बाब अत्यंत अभिमानास्पद असून मी या सर्व तरुणांचे कौतुक करत असल्याचे राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी नमूद केले.
यावेळी श्री. बनसोडे यांनी उदगीर विधानसभा मतदार संघात आपण केलेल्या व करत असलेल्या विकासात्मक कामाची माहिती ग्रामस्था समोर विशद केली.तसेच जिल्हयात कोरोनाचा प्रार्दूभाव वाढत आहे. काळजी करण्याची गरज नाही परंतु प्रत्येक व्यक्तिंनी फिजिकल अंतर बाळगून कोरोना प्रार्दुभावापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
करखेली येथिल तरुणांनी गढीभागातील परस बागेत, तरूणा साठी व ग्रामस्था साठी , प्रशासनाकडून “ओपन जीम ” ची मागनी करण्यात आली , या जीमचा गावातील सैन्य भरती साठी प्रयत्न करनाऱ्या तरुणांना व ग्रामस्थांना होणार असल्याची ग्वाही तरुणांनी दिली,
प्रारंभी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते गावात वृक्षारोपण करण्यात आले.या स्वच्छता अभियान कार्याक्रमास रा. का.प तालूका अध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे, चंद्रकांत खटके, ओमप्रकाश पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी झालेली तरुणाई मोठया संख्येने उपस्थित हो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *