महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पी.के. महाजन – दि.१३देशाची कोलमडलेली अर्थव्यवस्था पुर्व पदावर आणण्यासाठी विद्यमान सरकारने अर्थव्यवस्थेतील जाणकार लोकांची मदत घेतली पाहिजे अस मत देशाचे जेष्ठ अनुभवी नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी नुकतेच आपल्या मुलाखतीत म्हटल आहे……पण तसे घडतांना दिसत नाही उलट रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सोडून जातात. याचा विचार सरकारने केला पाहीजे. देशाच्या संरक्षणा इतकाच देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत असणं महत्वाचे आहे.
त्यामुळे विद्यमान सरकारने देशातील अर्थतज्ञांचीच समीती नेमली पाहीजे व त्यांच्या सल्ल्यानुसार नियोजन करून सर्व क्षेत्रात आवश्यक त्या योजना राबवल्या पाहीजेत. आज देशाला आर्थीक संकटांतुन बाहेर काढण्यासाठी माजी पंतप्रधान माननीय मनमोहनसिंग सारख्या तज्ञ अर्थमंत्री ची गरज आहे पण त्या बाबतीत सरकार फारसे जागरूक दिसत नाही.1991 मध्ये जागतीक खुल्या अर्थव्यवस्थेच्या उदारवादी धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था अशीच अडचणी त आली होती त्या वेळी डाॅ.मनमोहनसिंग देशाचे अर्थ मंत्री होते.
1991ते 1996 च्या कालावधीत अर्थमंत्री डाॅ.मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थीक संकटांतुन बाहेर काढण्या अनेक कठोर व नियोजनबद्ध अशा योजना राबवल्या त्याच धर्तीवर निर्णय घेण्याची आजही गरज आहे त्या साठी कोणाच्या ही सल्ल्याची गरज भासत तर सरकारने ती घ्यायला हवी. देशाला आत्मनिर्भर व बलशाली भारत बनवण्यासाठी राजकारण बाजुला ठेवून अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहण्याची खरी गरज आहे. सरकार त्या दृष्टीने पाऊले उचलून प्रयत्नही करत आहे.परंतु सदर प्रयत्न कमी पडतांना दिसत आहेत, त्यात सुधारणा होवून देशाची अर्थव्यवस्था पुर्व पदावर आणण्यात सरकारला लवकरच यश प्राप्त होवो हिच सदिच्छा. ………….पि.के.महाजन…जेष्ठ कर सल्लागार.