महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट ।। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सध्या जनसन्मान यात्र सुरू असून, ही यात्रा सध्या नाशिक जिल्ह्यात आहे. या यात्रेनिमित्त लासलगाव येथे अजित पवार यांची सभा सुरू होती. त्यावेळी बाजार समितीच्या भोंग्यावरून “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणाबाजीनंतर सभेच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान गेल्या एक वर्षांपासून मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. त्याबरोबर आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.