महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट ।। सर्वसामान्यांसाठी स्वस्तात घरे उपलब्ध करून देणे ही म्हाडाची ओळख आहे. मात्र मुंबई मंडळाकडून मुंबईकरांसाठी उपलब्ध करून दिलेल्या अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती पाहिल्या तर म्हाडाची स्वस्तात घरे उपलब्ध करून देणारी ओळख आता म्हाडाच विसरू लागली का? हा प्रश्न निर्माण करण्यात आला आहे.
मुंबई मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉटरीत अल्प उत्पन्न गटासाठी वरळीतील सस्मिरा येथील ५५० चौरस फूटाचा फ्लॅटची किंमत तब्बल २ कोटी ६२ लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. फ्लॅटची किंमत पाहून अल्प उत्पन्न गटातील घर घेणाऱ्यांचे मात्र डोळेच फिरले आहेत.
विजेत्याला या किमती सोबतच सेवाशुल्क आणि मालमत्ता कर देखील भरावा लागणार आहे. त्यामुळे या घराच्या किमतीत अधिक भर पडणार आहे. वार्षिक उत्पन्न 9 लाख रुपये असणाऱ्या नागरिकांसाठी हे घर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र बँक यावर इतके कर्ज देईल का हा प्रश्न देखील आता उभा राहिला आहे.