महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑगस्ट ।। आमचं सरकार 24 तास काम करणारं सरकार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी सांगत असतात. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 24 तासाची फोड करुन दिली आहे. आमचं सरकार 24 तास काम करत असतं, याचा पुनरुच्चार केला.उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर दौ-यावर आहेत.कागलच्या निपाणी वेसमध्ये अजित पवार गटाच्या भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय.या मेळाव्यातून हसन मुश्रीफ हे विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहेत.महायुतीमध्ये कागल मतदारसंघाचा पेच असताना अजित पवार हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर करतात का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
24 तास काम करणार सरकार
आमचं सरकार 24 तास काम करत असतं. आमचे मुख्यमंत्री पहाटे 4 वाजेपर्यंत काम करत असतात आणि मी पहाटे 5 वाजता उठून कामाला लागतो.याचा अर्थ आमचं सरकार 24 तास काम करणारं असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.