महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑगस्ट ।। श्रावणातील प्रत्येकच सोमवाराला तसं फार महत्त्व असतं. हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण हा महिना अत्यंत पवित्र तर श्रावणी सोमवार म्हणजे मोजून असा पवित्र दिवस सापडणार नाही असा दिवस. अर्थात या गोष्टी जरी अध्यात्मिक गोष्टींशी संबंधित असल्या तरी श्रावण आवडण्याचं दुसरं कारण म्हणजे निसर्ग! या महिन्यात अनेक लोक खूप ठिकाणी फिरायला जातात मग ते मंदिराचं का ठिकाण असेना. आज श्रावण मासातला दुसरा सोमवार. श्री क्षेत्र भीमाशंकरला शिवलिंगावर दुग्धाभिषेक झाल्यानंतर महाआरती शंखनाद करण्यात आला. हर हर महादेव..! ओम नम: शिवाय म्हणत देशभरातून भाविकांनी भीमाशंकरला गर्दी केलीय आज दुसऱ्या सोमवार निमित्ताने मुख्य शिवलिंगासह मंदिराला विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय.