BSNL New Sim Card : घरबसल्या मोबाईलवरून सुरु करा नवीन BSNL सिमकार्ड; काय आहे सोपी प्रोसेस?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। BSNL Network : देशातील दूरसंचार बाजारात एक नवी स्पर्धा निर्माण झाली आहे. भारताच्या प्रमुख खाजगी दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन्सचे दर वाढवल्यानंतर ग्राहकांचा कल आता BSNLकडे वळू लागला आहे. कंपनीच्या आकर्षक आणि किफायतदार प्लॅन्समुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात बीएसएनएलकडे येत आहेत. याचबरोबर कंपनीने देशभरात 4G सेवांचा विस्तार करण्यास सुरुवात केली असून पुढच्या वर्षी 5G सेवाही सुरू करण्याची तयारी आहे.

आंध्र प्रदेशात तर बीएसएनएलने एक विक्रमी कामगिरी केली आहे. जुलै महिन्यात कंपनीला २.१७ लाख नवे ग्राहक मिळाले आहेत. यामुळे आंध्र प्रदेशमध्ये बीएसएनएलच्या एकूण ग्राहकांची संख्या ४० लाखांवर पोहोचली आहे.

नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने 4G आणि 5G टेस्टिंगसाठी तयार असलेली सिमकार्ड्स बाजारात आणली आहेत. ही सिमकार्ड्स तुम्हाला बाजारातील दुकानांवर, बीएसएनएल ऑफिसमध्ये किंवा घरपोचही मिळू शकतात.

How to Activate BSNL 4G SIM Card
BSNL Network Check : तुमच्या एरियामध्ये BSNL ला रेंज आहे की नाही? सिमकार्ड घेण्यापूर्वीच असं चेक करा नेटवर्क स्टेटस
जर तुम्ही नव्याने बीएसएनएलचे ग्राहक झालात आणि तुमचे सिमकार्ड सक्रिय करायचे असेल तर आम्ही तुम्हाला सिम सुरू करायची सोपी पद्धत सांगणार आहे.

नवीन BSNL सिमकार्ड कसे सक्रिय करावे?
स्टेप १ : तुमच्या मोबाइल फोनमध्ये BSNL सिमकार्ड घाला आणि फोन रिस्टार्ट करा.

स्टेप २ : नेटवर्क सिग्नल येईपर्यंत वाट पहा.

स्टेप ३ : नेटवर्क सिग्नल आल्यानंतर फोन अॅप ओपन करा.

स्टेप ४ : तुमच्या फोनवरून १५०७ नंबर डायल करा.

स्टेप ५ : तुम्हाला तुमच्या ओळखीबाबत काही प्रश्न विचारले जातील.

पायरी ६ : टेली-वेरिफिकेशनसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा.

स्टेप ७ : प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे सिमकार्ड सक्रिय होईल.

स्टेप ८ : तुम्हाला तुमच्या फोनसाठी विशिष्ट इंटरनेट सेटिंग्स मिळतील.

स्टेप ९ : ही सेटिंग्स सेव्ह करा.

स्टेप १० : आता तुम्ही तुमच्या सिमकार्डचा वापर कॉलिंग आणि इंटरनेटसाठी करू शकता.

कार्ड आहे तरी काय?
या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे BSNL सिमकार्ड सहजपणे सक्रिय करू शकता आणि कंपनीच्या सेवांचा लाभ घेऊ शकता.

BSNLच्या या नव्या धोरणामुळे दूरसंचार बाजारात एक चांगली स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.पण शेवटी याचा फायदा ग्राहकांनाच होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *