महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑगस्ट ।। इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू जेम्स अँडरसनने नुकतीच आपली निवृत्ती जाहीर केली होती. अँडरसनने निवृत्ती जाहीर करुन केवळ एक महिना उलटला आहे. निवृत्तीनंतर लगेच एक महिन्यानंतर त्याने पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अँडरसनने आता पुन्हा क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
खरं तर, या वर्षी जुलैमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याने इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेट लीग द हंड्रेडमध्ये खेळण्याचे संकेत दिले आहेत. एका पॉडकास्टवर चर्चा करताना जेम्स अँडरसन म्हणाला की, ” कदाचित त्याच्यामध्ये अजून काही क्रिकेट शिल्लक आहे. मला वाटते की मला अजूनही क्रिकेट खेळण्याची भूक आहे, मला आणखी क्रिकेट खेळायचे आहे. जसजसे वर्ष पुढे जाईल तसतशी परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. इंग्लंड हिवाळ्याच्या मोसमात दोन मालिका खेळणार आहे, एक पाकिस्तानविरुद्ध आणि दुसरी न्यूझीलंड संघासोबत मी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असेल की नाही हे मला माहीत नाही.”
42 वर्षांचा अँडरसन म्हणतो की, “जेव्हा मी द हंड्रेड लीगमध्ये पहिल्या 20 चेंडूंमध्ये चेंडू स्विंग होताना पाहतो, तेव्हा मला वाटते की मी देखील हे करू शकतो. मला माहित नाही की पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये हे करणे माझ्यासाठी शक्य होईल की नाही. मी कधीच फ्रँचायझी क्रिकेट खेळलो नाही.
शेवटचा T20 सामना 2014 मध्ये खेळला गेला होता
जेम्स अँडरसनने 2019 पासून पांढ-या चेंडूचे कोणतेही क्रिकेट खेळलेले नाही त्याने 2014 मध्ये शेवटचा टी-20 सामना खेळला होता. ऑगस्ट 2014 मध्ये, तो इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये लँकेशायरकडून खेळताना दिसला. अँडरसनच्या T20 कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 44 सामन्यांत 41 विकेट घेतल्या होत्या. हंड्रेड लीगमध्ये मात्र, एक डाव फक्त 100 चेंडूचा असतो. या सामन्यांमध्ये टी-20 क्रिकेटपेक्षा आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते.