Pune News: पुणे ! ‘रातराणी’ तुमच्या सेवेत पुन्हा दाखल, असा असणार मार्ग.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑगस्ट ।। पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे स्टेशन ते निगडी या मार्गावर ‘रातराणी बस’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे स्टेशन, शिवाजीनगर येथून पिंपरी-चिंचवडला रात्री-अपरात्री जाणाऱ्या प्रवाशांना ‘रातराणी’ बससेवेचा फायदा होणार आहे.

पूर्वी पाच मार्गांवर सुविधा
पुणे शहरात रेल्वे, खासगी बसच्या माध्यमातून रात्री-अपरात्री येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. रात्री आलेल्या प्रवाशांची खासगी वाहन चालकांकडून लूटमार केली जात होती. त्यामुळे पीएमपीने पुण्यात पाच मार्गांवर रातराणी बस सुरू केली होती. त्याला चांगला प्रतिसाददेखील मिळत होता. त्यामुळे पुणे शहरातील प्रवाशांची सोय झाली होती; मात्र पुणे स्टेशन, शिवाजीनगर येथून पिंपरी-चिंचवड परिसरात जाणाऱ्यांसाठी काहीही सोय नव्हती.

पाच रुपये जादा तिकीट
यामुळे पिंपरी-चिंचवडसाठीदेखील एक रातराणी बस सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार पीएमपीने पुणे स्टेशन ते निगडी मार्गवर पीएमपीची रातराणी सेवा सुरू केली आहे. निगडी ते पुणे स्टेशन या मार्गावर ‘रातराणी बस’ सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. निगडी आगारातून दररोज रात्री ११.३० वाजता आणि पुणे स्टेशनवरून रात्री साडेबारा वाजता पहिली बस सुटणार आहे. रातराणी बस प्रवासासाठी प्रवाशांना दिवसाच्या तिकीट दरापेक्षा पाच रुपये जादा मोजावे लागणार आहेत.

रातराणी बसचा मार्ग
निगडी ते पुणे स्टेशन : निगडी, चिंचवड, वल्लभनगर आगार, कासारवाडी, बोपोडी, वाकडेवाडी, आरटीओ आणि पुणे स्टेशन.
पुणे स्टेशन ते निगडी : पुणे स्टेशन, आरटीओ, इंजिनीअरिंग कॉलेज, लोकमंगल (शिवाजीनगर), वाकडेवाडी, कासारवाडी, वल्लभनगर आगार, चिंचवड, निगडी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *