‘अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहणार’; मुख्यमंत्री

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑगस्ट ।। ‘आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) तुमचे आशीर्वाद राहू द्यावे. अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू राहील. येत्या १७ ऑगस्टला दोन महिन्यांचे तीन हजार रुपये प्रत्येक बहिणीच्या खात्यात नक्की पडतील,’ असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

जळगाव येथील सागर पार्क मैदानावर आज महिला सशक्तीकरण अभियानात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा व युवक मंत्री रक्षा खडसे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेला महिलांचा अफाट प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांचे पोट दुखू लागले आहे. महायुतीचे सरकार महिलांचे सक्षमीकरण करणारे, शेतकरी, महिला, युवा आदी सर्वांना देणारे सरकार आहे. विरोधक आता आमच्या योजनांचा अपप्रचार करीत आहे. ही योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणली आहे.

या योजनेचे पैसे परत घेतले जातील, महिलांना विकत घेण्याचे काम सरकार करते आहे, ही योजना नंतर बंद होईल अशा अफवांचे पीक विरोधक पसरवीत आहे. बहिणींनो अशा भूलथापांना बळी पडू नका. अशा ‘सावत्र भावा’पासून सावध राहा. हा भाऊ (मुख्यमंत्री) व मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही महायुतीला विधानसभा निवडणुकीत साथ द्या, तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *