महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी डिझेलमध्ये वाढ केली होती.मात्र आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीला ब्रेक लावला. दोन्ही इंधनांचे भाव स्थिर ठेवले आहेत.
इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार गुरुवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.१९ रुपये कायम असून डिझेलचा भाव ७९.४० रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८१.१८ रुपये असून पेट्रोल ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.१० रुपये असून डिझेल ७६.३३ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ८३.६३ रुपये असून डिझेल दर ७८.२२ रुपयांवर कायम आहे.