महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – वडगाव मावळ : मावळ तालुक्यात बुधवारी तळेगाव येथील दोन तर खंडाळा, कामशेत, ब्राम्हणवाडी, देवले व साई येथील प्रत्येकी एक अशा एकूण सात जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २६२ झाली आहे.
दरम्यान, त्यात शहरी भागातील ९५ तर ग्रामीण भागातील १६७ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक ६९, लोणावळा येथे १८ तर वडगाव येथे रुग्ण संख्या आठ झाली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून ९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची टक्केवारी सुमारे ४० टक्के एवढी आहे. सध्या सक्रिय असलेल्या १५८ रुग्णांपैकी ८२ जण लक्षणे असलेले तर ७६ जण लक्षणे नसलेले आहेत. लक्षणे असलेल्या ८२ जणांपैकी ६७ जणांमध्ये सौम्य स्वरूपाची तर १२ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. तीन जण अत्यवस्थ आहेत. सध्या ११७ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असून ४१ जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ.चंद्रकांत लोहारे यांनी दिली.