महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ ऑगस्ट ।। राज्यामध्ये आतापर्यंत पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्यासाठ्यात अपेक्षित वाढ झालीय. वादळी वारे अन् मेघगर्जनेसह पावसाने अनेक जिल्ह्यांत जोरदार तडाखा दिलाय. सध्या पावसाने थोडी उसंत घेतल्याचं दिसतंय. ढगाळ हवामान असल्यामुळे उकाड्यामध्ये देखील वाढ झालीय. आज २२ ऑगस्ट रोजी राज्यामध्ये विजांसह पावसासाठी येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केलाय.
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा
श्रावण महिन्याचा तिसरा आठवडा सुरू असुन आजही तुरळक श्रावणसरी बरसण्याचा अंदाज आहे. उत्तर बांगलादेश आणि परिसरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे ही प्रणाली पश्चिम बंगालकडे सरकण्याचा अंदाज वर्तवला जातोय. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने जारी केलाय आहे. उर्वरित राज्यामध्ये विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने (maharashtra weather Forecast update ) दिलाय.
श्रावणसरी बरसण्याचा अंदाज
पुणे, सांगली, सातारा, रायगड आणि अहमदनगर येथे आज हलक्या पावसाची शक्यता दर्शवणारा अंदाज हवामान खात्याने हवामान सल्लागार जारी (maharashtra weather update) केलाय. या व्यतिरिक्त विदर्भ, रायगड आणि अहमदनगरच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदियासह विदर्भातील भागातही आज पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता
२४ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज (Rain update) आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या अंदाजाची गांभीर्याने दखल घेण्याचं आवाहन संबंधित प्रशासनानं केलंय. पुणे आणि राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांसाठी हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. सिंधुदुर्गमध्ये आज जोरदार पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात (latest rain news) आलाय. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.